✨कल्याण हादरलं! मराठी मुलीला मारहाण करणारा गोकुळ झा पकडला; कोर्टातही तमाशा
मुंबईतील गोकुळ झा प्रकरण – मराठी मुलीला मारहाण करणारा आरोपी पकडला!
*तारीख:* 24 जुलै 2025
*लेखक:* किशोर चव्हाण
📌 घटना घडली कसी
कल्याणमधील एका बालरुग्णालयात काही दिवसात घडलेली घटना महाराष्ट्रभर चर्चेत आहे.
एका रिसेप्शनिस्ट मराठी मुलीला रुग्णालयात काम करत असताना *गोकुळ झा* नावाच्या गुंडाने उघड्यावर अमानुष मारहाण केली.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरला आणि नागरिकांचा संताप ओसंडून वाहू लागला.
facebook link :https://www.facebook.com/share/v/19BJoMnvig/
🚨त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडकीस आली आहे मुंबईतील
गोकुळ झा हा साधा रुग्ण नव्हता तो एक अस्सल गुन्हेगार होता .
त्याचं नाव आधीपासूनच कल्याण‑डोंबिवली परिसरातल्या अनेक गंभीर गुन्ह्यांत नोंद आहे.
* हत्यार नाचवत दहशत माजवणे
* एका ट्रक चालकाला हात्याराणे सपा सप वार केले .
* फेरीवाल्यांकडून खंडणी उकळणे
* दरोडे आणि मारहाणीचे गुन्हे आहेत
याच कारणामुळे पोलिसांच्या रडारवर तो आधीपासूनच होता.
🔎 घटना घडली कशी ते पाहू
व्हिडिओमध्ये दिसतं की –
👉 संध्याकाळी 6:38 मीनीटाणे गोकुळ आणि त्या रिसेप्शनिस्ट मुलीमध्ये वाद झाला.
👉 काही मिनिटांनी गोकुळ पुन्हा आत घुसला आणि लाथ मारली.
👉 त्यानंतर संतापलेल्या मुलीने गोकुळच्या वहिनीला चापट मारली.
👉 हे पाहून गोकुळ झा पुन्हा आत येऊन अमानुष मारहाण करू लागला.
👉 तुमी या विडियो मधे पाहू शकता .
हा सर्व प्रकार **सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झालेला दीसतो आहे .
🛑 मनसे कार्यकर्त्यांच्या चपळाईमुळे सापडला
घटनेनंतर गोकुळ झा फरार झाला, पण मनसे कार्यकर्त्यांनी सतत शोध सुरू ठेवला.
शेवटी *नेवाळी फाट्याजवळ* त्याला ओळखून ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या हवाली केलं.
पण तो स्टाइल चेंज केला होता तरी त्याला पकडले .
तो केस कापून आणि कपडे बदलून लपण्याचा प्रयत्न करत होता, पण यशस्वी झाला नाही.
⚖ कोर्टातही त्याने तमाशा घातला
गोकुळला कोर्टात हजर केल्यानंतर त्याने बुरखा काढून आरडाओरडा केला आणि पोलिसांना धक्काबुक्की केली.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू असतानाच हा प्रकार घडला, ज्यावर न्यायालयाने त्याला *कडक तंबी* दिली.
मग तो शांत झाला आणी गप्प बसला .
👥 जनतेकडून प्रतिक्रिया यायला लागल्या .
या घटनेनंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
“**मुलींवर हात उचलणाऱ्याला अशी शिक्षा व्हायला हवी की पुन्हा कोणीही हिंमत करणार नाहीमहाराष्ट्रा मध्ये अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मनसे कार्यकर्त्यांच्या चपळाईमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे गोकुळ झा सध्या तुरुंगात आहे.
✨ निष्कर्ष असा नीगतो की ,
ही घटना आपल्याला आठवण करून देते की गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी केवळ पोलिस नव्हे तर समाजातील प्रत्येक जागरूक नागरिक महत्त्वाचा आहे.
*“गुन्हेगार कितीही धूर्त असला तरी न्यायाच्या जाळ्यातून सुटू शकत नाही.”*
📌 SEO Tags
गोकुळ झा, मराठी मुलीला मारहाण, कल्याण गुन्हेगारी, मनसे बातमी, Breaking News Maharashtra, Crime News मनसे कार्यकर्ते Mahatazakhaber




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य भाषा वापरा. चुकीच्या कमेंट्स delete केल्या जातील.